अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात पुढील दोन दिवस धोक्याचे आहेत. अरबी समुद्रात खोलवर निर्माण झालेले वायू चक्रीवादळ गुजरातकडे सरकले असले तरी कोकण किनारपट्टीवरील धोका कमी झालेला नाही. त्यामुळे रासगड जिल्हा प्रशासनाने समुद्रकिनार्या लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
बुधवारी (दि. 12) दुपारी 12 वाजल्यापासून पावसाला सुरूवात झाली. पावसाबरोबर जोरदार वारे वहात होते. पावसाचा जोर किनारपट्टीच्या भागात अधिक होता. पुढील दोन दिवसात उत्तर रायगडच्या काही भागात वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल. जोरदार वारे वाहतील त्याचबरोबर समुद्र खवळलेला असेल तसेच सुमारे सहा मीटर उंचीच्या लाटा उसळतील, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. त्यामुळे रायगड जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत .
वायू चक्रीवादळ वादळ गुजरातच्या दिशेने सरकले असले तरी कोकण किनारपट्टीवरील धोका कमी झालेला नाही. मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जावू नये. तसेच येथे आलेल्या पर्यटकांनी, रहिवाशांनी किनार्यापासून दूर रहावे, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर पुढचे दोन दिवस धोक्याचे राहणार आहेत.
-कोकण किनार्यावर वादळी वार्यांसह पाऊस होणार आहे. समुद्र खवळलेला असेल, त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे. विशेषतः किनारपट्टीच्या भागात राहणारे नागरिक व पर्यटकांनी समुद्र किनारी जावू नये. मच्छीमारांनीदेखील समुद्रात जावू नये. संभाव्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. -सागर पाठक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी