Breaking News

नेरळ धरण झाले गाळमुक्त, माती व दगड बाहेर काढण्यात यश

कर्जत : बातमीदार

नेरळ ग्रामपंचायतमध्ये असलेल्या ब्रिटिशकालीन धरणातून तब्बल दहा वर्षानंतर गाळ काढण्यात येत आहे. या धरणातून आतापर्यंत किमान 900 ट्रक गाळ काढण्यात आला असून, मोठ्या प्रमाणात दगडही बाहेर काढले आहेत. त्यामुळे धरणातील पाणी साठा अधिक होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, धरणातील गाळ काढताना त्या परिसरात तब्ब्ल दोन ठिकाणी गार्डन विकसित कारण्यास जागा उपलब्ध झाली आहे.

नेरळ ग्रामपंचायतीचे हे धरण  मातीने भरले होते. यावर्षी अनेक स्थानिकांनी मागणी केल्यानंतर ग्रामपंचायतीने निधीची तरतूद करून, मे महिन्यात धरणातील शिल्लक असलेले पाणी सोडून दिले होते. त्यानंतर गेल्या 15 दिवसापासून धरणातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. माथेरान डोंगरातून वाहून येणारे पाणी मोठ्या प्रमाणात या धरणात येते. त्याबरोबरच दरवर्षी दगड आणि माती वाहून येत असते. त्यामुळे या धरणातील किमान तीन एकरचा परिसर दगड आणि मातीने व्यापला होता.  धरणातील पाणी साठा वाढावा, असा प्रयत्न उपसरपंच अंकुश शेळके यांनी सुरु केला.  आधी पाणी सोडून दिल्यानंतर धरणाच्या तिन्ही बाजूला जेसीबी मशीनच्या सहाय्याने जलसाठा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आणि आज त्या ठिकाणी मोहचीवाडी बाजूला एक मोठे मैदान निर्माण झाले आहे.

धरणातील पाणी सोडल्यानंतर ज्याला हवी आहे, त्याला गाळयुक्त माती नेण्याचे धोरण सरपंच जान्हवी साळुंखे यांनी जाहीर केल्याने अनेकांनी आपल्या शेतीसाठी अशी माती नेण्यास भर दिला. त्यामुळे धरणाच्या मुख्य जलाशयातील माती अधिक लवकर  काढली जाऊ शकली. 

केवळ धरणातील पाणी साठा वाढावा, हा हेतू ग्रामपंचायतीने ठेवलेला नाही, तर धरण अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्या ठिकाणी असलेला बंधा़र्‍याला लागलेली गळती रोखण्यासाठी बांधकाम केले जात आहेत. तत्कालीन सरपंच भगवान चंचे यांनी त्या भागात निर्माण केलेले पर्यटन केंद्रांची डागडुगीदेखील करण्यात येत आहे.

– ग्रामपंचायतीच्या मालकीच्या ब्रिटीशकालीन धरणाच्या खालच्या बाजूला नव्याने मातीचा भराव करून, त्या ठिकाणी या पावसाळ्यात एक बगीचा फुलविण्यात येईल. -जान्हवी साळुंखे, सरपंच, नेरळ

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply