Breaking News

पनवेल तालुक्यात 220 नवे कोरोनाग्रस्त

12 जणांचा मृत्यू; 186 रुग्णांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि.23) कोरोनाचे 220 नवीन रुग्ण आढळले असून 12 जणांचा मृत्यू झाला आहे तर 186  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत 171 नवीन रुग्णांची नोंद झाली असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर 151 रुग्ण बरे झाले आहे. ग्रामीणमध्ये 49 नवीन रुग्णांची नोंद झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 35 रुग्ण बरे झाले आहे.

महापालिका हद्दीत नवीन पनवेल  आचंल सोसायटी, पनवेल धोबी आळी, पनवेल तक्का वैदुवाडी आणि नवीन पनवेल सेक्टर 13 बी 10 मधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर कामोठे मानसरोवर कॉम्प्लेक्स, कामोठे तुळशी आंगण, कळंबोली सेक्टर 8 ई पटेल प्लाझा व पनवेल शिवाजी नगर झोपडपट्टी यांचा या आधीच कोरोनामुळे  मृत्यू झाला होता त्याचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला. आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 41, कामोठे 25, खारघर 27, नवीन पनवेल 42, पनवेल  23, तळोजा 13 अशी विभागवार आकडेवारी आहे. महापालिका क्षेत्रात एकूण 5421 रुग्ण झाले असून 3895 रुग्ण बरे झाले आहेत. 1391 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 135  जणांचा मृत्यू झाला आहे.

ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांत उलवे 10,  करंजाडे, विचुंबे, सुकापूर प्रत्येकी चार, आदई तीन, गव्हाण, ओवाळे, दापोली, कराडे बुद्रुक सोमाटणे प्रत्येकी दोन तर बोर्ले, नांदगाव, पळस्पे, पाले बुद्रुक, चिपळे, डेरवली, देवळोली, दुंदरे, गुळसुंदे, पाली देवद, शिरढोण, उसर्ली खुर्द, विहीघर आणि देवद  येथे प्रत्येकी एक नवीन रुग्ण आढळला आहे. तर कोपर गव्हाण, सुकापुर, गव्हाण आणि ओवळे येथील रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीणमध्ये एकुण रुग्ण संख्या  1751  झाली असून 1203 जणांनी कोरोनावर मात केली असून 38 जणांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत आढळले 330 जण कोरोनाबाधित

नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत गुरुवारी 330 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोना बधितांची एकूण संख्या 12 हजार 599तर 211 जण बरे होऊन घरी परतल्याने बरे झालेल्यांची आठ हजार 136  झाली आहे. गुरुवारी सात जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 365 झाली आहे. नवी मुंबईचा रिकव्हरी रेट 65 टक्क्यांवर स्थिरावला आहे. नवी मुंबईत आतापर्यंत 30 हजार 837 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 17 हजार 891 जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. सद्य स्थितीत नवी मुंबईत चार हजार 98 रुग्ण उपचार घेत आहेत. आढळलेल्या रुग्णांची विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर 49, नेरुळ 77, वाशी 42, तुर्भे 16, कोपरखैरणे 68, घणसोली 34, ऐरोली 38 व दिघा 6 असा समावेश आहे.

उरणमध्ये 27 जणांना कोरोनाचा संसर्ग

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर – उरण तालुक्यात गुरुवारी 27 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर 15 रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. 703 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 530 रुग्ण आत्तापर्यंत पूर्ण बरे झाले आहेत. आढळलेल्या रुग्णांमध्ये उरण शहरातील कोप्रोली तीन, डोंगरी तीन, बोरी नाका तीन, केगाव दोन, जासई दोन, देऊळवाडी, माजिद मोहल्ला, वाणी आळी, बोकडविरा, मुळेखंडफाटा, द्रोणागिरी कॉलिनी, मुळेखंड, भेंडखळ बिपीसीएल टर्मिनल्स, पाणजे, दिघोडे,  धाकटीजुई, जेएनपीटी, वेश्वि, विंधणे येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तर बरे झालेल्या रुग्णांमध्ये जेएनपीटी चार, रामचंद्र विद्यालय जवळ आवरे दोन, जसखार दोन, द्रोणागिरी कॉलिनी, वशेणी, विमला तलाव, ओंकार कॉलिनी, मोरा, नागाव पिरवाडी, सर्वेश सिद्धिविनायक सोसायटी येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. विद्यमान 152 रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून तालुक्यात कोरोनामुळे 21 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. असल्याची माहिती उरणचे आरोग्य अधिकारी राजेंद्र इटकरे यांनी दिली आहे.

रोहा तालुक्यात पाच जणांना बाधा

रोहे : प्रतिनिधी – रोहा तालुक्यात गुरुवारी पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची  व तीन रुग्णांनी कोरोनावर मात करीत बरे झाले असल्याची माहिती तहसीलदार कविता जाधव यांनी दिली.आढळलेल्या रुग्णांमध्ये एक शहरातील व चार ग्रामीण भागातील असून यात तालुक्यात दमखाडी, आरोळी भालगाव, श्रीकृष्ण नगर भुवनेश्वर, आंबेवाडी कोलाड, पिंगळसई येथे प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तालुक्याची एकुण रुग्ण संख्या 403 झाली असून 296 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत तालुक्यात नऊ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 98 रुग्ण उपचार घेत आहेत.

कर्जत तालुक्यात 24 कोरोना पॉझिटिव्ह

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार – कर्जत तालुक्यात गुरुवारी 24 रुग्ण आढळले असून आतापर्यंत तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 384 वर गेला आहे. त्यापैकी 291 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.आढळलेल्या रुग्णांमध्य मुद्रे बुद्रुक गावात पाच, मुद्रे खुर्द दोन, दहिवली सात, कर्जत दोन, दामत, कळंब, भालिवली, नेवाळी, भिसेगाव, हालिवली, वारे, चिंचवाडी येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

नागोठण्यात नऊ नवे रुग्ण

नागोठणे : प्रतिनिधी – नागोठणे शहरात एक विवाहित महिला तसेच विभागात रोहे तालुक्यातील पाईपनगर, सुकेळी येथे पन्नास वर्षीय पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आली आहे. तर, विभागात पेण तालुक्यातील गावांमध्ये तब्बल सात रुग्ण आढळले असून त्यात रिलायन्स निवासीसंकुल तीन, बेणसे दोन, झोतीरपाडा एक आणि कोलेटी एक येथील रुग्णांचासमावेश आहे. लॉकडाऊन असूनही विभागात कोरोनाची साखळी तोडण्यात यश येत नसल्याचे यामुळे स्पष्ट होत आहे.

माणगावमध्ये नऊ जणांना लागण

माणगाव : प्रतिनिधी – माणगाव तालुक्यात गुरुवारी नगरपंचायत हद्दीतील पाच, गोरेगाव येथे तीन, मळ्याची वाडी निजामपूर येथे एक अशा एकूण नऊ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून तालुक्यातील गोरेगाव व मोर्बा येथील प्रत्येकी एक रुग्ण अशा दोन रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप इंगोले यांनी दिली.तालुक्यातील 45 गावांतून आजपर्यंत 241 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 171 रुग्ण बरे झाले असून तिघांचा मृत्यू झाला आहे.

महाडमध्ये नव्याने सात रुग्ण

महाड : प्रतिनिधी – महाड मध्ये गुरुवारी सात नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर कोणाचाही मृत्यू झालेला नाही. महाड तालुक्यातील कडकडीत लॉकडाऊन आणि महाडकरांच्या संयमाला यश येताना दिसत असुन, कोरोना फैलाव मंदावला आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये चवदारतळे 57 वर्षीय पुरुष, देशमुखमोहल्ला  44 वर्षीय पुरुष, घर क्र.24045 33 वर्षीय पुरुष, वहूर 50 वर्षीय पुरुष, गवळआळी 31 व 54 वर्षीय पुरुष, बिरवाडी 58 वर्षीय पुरुष यांना कोरोनाची लागण झाली आहे. महाडमध्ये एकुण 101 रुग्ण उपचार घेत असुन, 128 जन बरे झाले आहेत तर अजुनपर्यंत 244 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

Check Also

पनवेलमध्ये शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला गळती लागली …

Leave a Reply