Breaking News

तीन तास अथक प्रयत्नानंतर माथेफिरुला खाली उतरवले

अग्निशमन दलाच्या जवानांचे यश

पनवेल : वार्ताहर

कामोठे वसाहत सेक्टर 17मध्ये ओम शिव इमारतीच्या एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील ग्रीलवर अज्ञात माथेफिरु अडकून बसल्याची घटना शुक्रवारी (दि. 15) रात्री उशिरा घडली. तब्बल तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी या माथेफिरुला खाली उतरवले. या अज्ञात माथेफिरुची ओळख अद्याप पटली नाही.

कामोठे वसाहत सेक्टर 17 मधील ओम शिव इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील ग्रील वर एक अज्ञात इसम चढल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. या व्यक्तीच्या अंगावर  पूर्ण कपडे नव्हते. ही व्यक्ती ग्रील वर चढली होती. या सोसायटी मधील रहिवासी तसेच सेनेच्या महिला संघटक सुलक्षणा जगदाळे यांनी या घटनेची माहिती स्थानिक कामोठे पोलीस आणि अग्निशमन दलाला दिली. ही माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोचले. या व्यक्तीला खाली उतरविण्यासाठी अथक प्रयत्न सुरू होते. मात्र त्याला खाली येता येत नव्हते व तो येण्याचा प्रयत्नही करत नव्हता. अनेक वेळा विनंती आणि त्याच्याशी संवाद साधून खाली उतरण्याचा प्रयत्न देखील केला, मात्र हा माथेफिरु खाली येण्यास तयार नव्हता. अग्निशमन दलाचे जवानांनी त्याला बर्‍याच प्रयत्नानंतर खाली उतरविले. खाली उतरवत असताना देखील पुन्हा तो वर चढण्याचा प्रयत्न करीत होता. या अज्ञात माथेफिरुच्या कृत्याने इमारतीसह कामोठे वसाहतीतील नागरिक भयभीत झाले होते. त्या माथेफिरुला उतविताना नागरिकांची तोबा गर्दी जमली होती.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply