पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल रेल्वे स्टेशनवर विना तिकीट पकडलेला प्रवाशी निघाला कर्नाटकातील फरार आरोपी निघला. फलाटावरील प्रवाशाने दिलेल्या महितीमुळे पनवेलच्या तिकीट तपासणीसांनी आपला जीव धोक्यात घालून त्याला पळताना पकडून पोलिसांच्या हवाली केल्याबद्दल तिकीट तपासणीस अक्षता वर्मा, विष्णु परब आणि त्यांच्या सहकार्यांचे कौतुक होत आहे.
शनिवार (दि. 22) सकाळी 9. 30 वाजता पनवेल रेल्वे स्टेशनवर तिकीट तपासनीस अक्षता वर्मा ड्युटीवर होत्या. पनवेल स्टेशनवर आलेल्या लोकलमधील एका तरूणाला हटकले असता. त्याच्याजवळ तिकीट नसल्याने अक्षता वर्मा त्या युवकाला मुख्य तपासणीसांच्या केबिनकडे आल्या. त्याचवेळी फलाट क्रमांक पाचवर बसलेल्या एका प्रवाशाचे लक्ष त्यांचेकडे गेले आणि तो चमकला, कारण विना तिकीट पकडलेला तरूण हा कन्नुर येथून पोलिसांच्या ताब्यातून पळून आलेला रुबेस असल्याचे त्याने ओळखले. पनवेलमध्ये दोघे एकाच हॉटेलमध्ये काहीकाळ काम करीत होते.
या प्रवाशाने वरिष्ठ तिकीट तपासनीस विष्णू परब यांना याची कल्पना दिली. रुबेस त्याला आपल्या भाषेत यांना काही सांगू नकोस, तुला काय पाहिजे ते देतो असे सांगू लागला. विष्णू परब यांनी आपल्या वरिष्ठांना याची माहिती दिली. त्यांनी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात त्याला देण्यास सांगितले. रेल्वे पोलिसांना फोन करून माहिती देताच आता आपण पकडले जाणार हे लक्षात येताच त्याने दरवाजाकडे धाव घेतली, तेथे उभे असलेले वरिष्ठ तपासणीस विठ्ठल देसाई यांना धडक देऊन पळण्याचा प्रयत्न केला. दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशाने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही ढकलत तो बाहेर पडला, पण तिकीट तपासनीस विष्णु परब, विठ्ठल देसाई, विवेक पाटोळे, उषा सिंग आणि अक्षता वर्मा त्याच्या मदतीला आल्या. या सर्वांनी त्याला पकडून ढकलत रूममध्ये आणले आणि सगळे दरवाजात उभे राहिले.
रेल्वे पोलीस त्याठिकाणी आले, पण आरोपीबद्दल काहीच माहिती नसल्याने त्याला कसे ताब्यात घ्यायचे, हा प्रश्न त्यांच्यापुढे पडला. अखेर तो ज्या हॉटेलमध्ये कामाला होता त्या मालकाला बोलविण्यात आले. त्याचे नातेवाईक कर्नाटकात पोलीस अधिकारी होते त्यांना फोन लावून दिला असता त्याच्यावर थाली परंबा आणि कोजिकोड मेडिकल कॉलेज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे समजले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वृषाली कवनपुरे यांनी तेथील पोलिसांशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. दुसर्या दिवशी विमानाने तेथील पोलिसानी पनवेलला येऊन त्याला ताब्यात घेऊन ते कर्नाटकला घेऊन गेले. रुबिस हनी ट्रपच्या गुन्ह्यातील आरोपी असून त्याने अनेक श्रीमंत महिलांना व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून करोडो रुपयांना फसवले असल्याचे समोर आले आहे. स्कूटर चोरीप्रकरणात त्याला अटक केले असता त्याच्या फोनमध्ये गुप्त कोड सापडले, त्याची तपासणी केली असता हनी टॅ्रपची माहिती मिळाली. अटक असताना व कोजिकोड मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू असताना पोलिसांचे विशेष पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी आले असता तो पळून गेला होता.