Breaking News

मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपचे संयुक्त मोर्चा संमेलन

मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार रप्रशांत ठाकूर यांचे मार्गदर्शन

मावळ : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या नवव्या वर्षपूर्तीनिमित्त राबविण्यात येणार्‍या महाजनसंपर्क अभियान अंतर्गत मावळ लोकसभा मतदारसंघातील तळेगाव दाभाडे येथे संयुक्त मोर्चा संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी राज्याचे पर्यटन विकासमंत्री मंगलप्रभात लोढा आणि भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले.
या संमेलनास आमदार उमाताई खापरे, माजी मंत्री बाळा भेगडे, पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, चिंचवड विधानसभेचे नेते शंकरशेठ जगताप, रवींद्र भेगडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी मोदी ऽ 9 अभियानाच्या अनुषंगाने मावळ लोकसभा क्षेत्रात सुरू असलेल्या संघटनात्मक कार्याचा आढावा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतला व प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्याने आगामी काळात संघटनात्मक जबाबदार्‍या चोख पार पाडून पंतप्रधान नरेंद्र यांनी गत नऊ वर्षांमध्ये सेवा, सुषाशन आणि गरिबांच्या कल्याणासाठी राबविलेल्या लोककल्याणकारी योजनांची तसेच विकासकामांची माहिती बूथ स्तरापर्यंत घरोघरी जाऊन पोहचविण्याच्या सूचना केल्या. आमदार प्रशांत ठाकूर यांनीही कार्यकर्त्यांना बहूमोल मार्गदर्शन करून पक्षवाढीसाठी मेहनत घ्यावी, असे आवाहन केले.

Check Also

पनवेल ग्रामीण भागातील रस्त्यांचा होणार विकास

50 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता; आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व पाठपुराव्याला यश पनवेल …

Leave a Reply