Breaking News

माणगावमध्ये दोन गटांत जोरदार राडा

माणगाव : प्रतिनिधी

मागील भांडणाचा राग मनात धरुन मंगळवारी (दि. 25) रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास माणगावातील दत्तनगर भागात दोन गटांत जोरदार राडा झाला. त्यात पाच जण जखमी झाले. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या असून, सात जणांवर माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञानेश्वर नरसू पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आदित्य पवार व त्याच्या दोन मित्रांनी (नाव, गाव माहित नाही) संगनमत करुन त्यांना हाताबुक्याने मारहाण केली. व त्यांचा भाऊ महादेव नरसू पवार (वय 35)याच्या पाठीवर कोयत्याने वार करुन दुखापत केली. व ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तिघाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर रमेश दादाराम साळूंखे (वय 26) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ज्ञानेश्वर पवार, महादेव पवार आणि त्यांच्या आई व बहिणी विरुध्द  गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक फौजदार सायगांवकर करीत आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply