Breaking News

महिला मोर्चा संयोजकपदी अश्विनीताई पाटील

खोपोली : प्रतिनिधी – कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघासाठी भाजप महिला मोर्चा संयोजकपदी रायगड जिल्हा उपाध्यक्षा अश्विनीताई पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीबद्दल अश्विनीताई पाटील  यांचा खोपोली शहर मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पक्षाच्या बैठकीत कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघांचे भाजप अध्यक्ष माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या उपस्थितीत  सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष श्रीकांत पुरी, उपाध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, सरचिटणीस हेमंत नांदे, दिलीप पवार, माजी नगराध्यक्ष रोहिदास पाटील, संभाजी नाईक, भाजप सोशल मीडियाचे राहुल जाधव, एस. टी. पाटील यांच्यासह पक्षाचे  पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघात महिला मोर्चाचे संघटन प्रभावीपणे करून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली भाजपसाठी पोषक वातावरण करणार असल्याचे अश्विनीताई पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply