Breaking News

उरण महाविद्यालयात अध्यापक विकास कार्यशाळा

उरण ः वार्ताहर

रोजी कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयामध्ये तीन दिवसीय अध्यापक विकास कार्यशाळा झाली. दि. 5 ते दि. 07 जुलै 2019 या कालावधीत ‘नॅक’साठीच्या कागदपत्रांची तयारी या विषयावर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व  कर्मचार्‍यांसाठी ही कार्यशाळा घेण्यात आली होती.  प्राचार्य के. ए. शामा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यशाळेसाठी नूतन महाविद्यालय सेलू, जि. परभणी येथील इंग्रजी विभागाच्या प्राध्यापिका डॉ. निर्मला पद्मावत मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी या कार्यशाळेत नॅकसाठीच्या कागदपत्रांची तयारी कशी करावी व नॅकला सामोरे जाताना कोणकोणत्या समस्या येऊ शकतात व त्यांचे निरसन कसे करावे, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य के. ए. शामा यांनी डॉ. पद्मावत यांच्या मार्गदर्शनामुळे कामाची दिशा मिळेल, असे मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील नॅक विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. पराग कारुळकर यांनी मेहनत घेतली. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होते.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply