Breaking News

सरपंच अमित पाटील यांच्याकडून दिघाटीतील पूरग्रस्तांना नाश्तावाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

मुसळधार पावसामुळे घरात पाणी शिरून हवालदिल झालेल्या दिघाटी ग्रामस्थांसाठी सरपंच अमित पाटील यांनी नाश्त्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.

गेले काही दिवस पडलेल्या पावसामुळे रविवारी सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली होती. पनवेल तालुक्यातील दिघाटी गावातही पाताळगंगा नदीचे पाणी शिरले होते. हे पाणी ग्रामस्थांच्या घरात शिरल्याने त्यांची परवड झाली. अशा वेळी सरपंच अमित पाटील त्यांच्यासाठी धावून आले. त्यांनी आपल्या सहकार्‍यांना सोबत घेत पूरग्रस्तांना समोसा, बिस्कीट यांचे वाटप केले. त्यामुळे सकाळपासून उपाशी असलेल्या गावकर्‍यांना हायसे वाटले. याबद्दल त्यांनी सरपंच अमित पाटील यांचे आभार मानले आहेत.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply