उरण : वार्ताहर
ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या फूंडे येथील वीर वाजेकर महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाच्या वतीने राष्ट्रीय ग्रंथपाल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. साहेबराव ओहोळ यांच्या हस्ते रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी सकाळ सत्राचे प्रमुख महाले, दुपार सत्राचे प्रमुख घोरपडे, ग्रंथालय कमिटीचे सदस्य, विविध विभागांचे विभाग प्रमुख आणि इतर प्राध्यापक आदी उपस्थित होते.
या ग्रंथालय दिनाचे औचित्य साधून भारतीय साहित्यातील सर्वोच्च समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार आतापर्यंत ज्या मराठी लेखकांना मिळाला आहे. त्यांच्याविषयी ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त मराठी सारस्वत असे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार सुप्रिया नवले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नर्मदा रोज, कमल बंगारे काका, जोशी काका यांनी परिश्रम घेतले.