Breaking News

‘स्पिडी’मधील स्थानिक कामगारांवर अन्याय होऊ देणार नाही’

उरण : वार्ताहर

स्पिडी मल्टीमोडल प्रा.लि. या मालाची हाताळणी करणार्‍या प्रकल्पातील स्पिडी इंडस्ट्रियल सर्व्हिस प्रा.लि. हा खाजगी ठेकेदार सोडून गेल्याने या ठेकेदाराच्या माध्यमातून प्रकल्पात सफाई कामगार म्हणून काम करणार्‍या 47 कामगारांवर पुढे अन्याय होऊ नये आणि ते काम करीत असणारी नोकरी अबाधित राखण्यासाठी स्पिडी व्यवस्थापनाने स्थानिक ठेकेदाराची नियुक्ती करीत सदर प्रकल्पात सफाई कामाचा ठेका हा स्थानिक ठेकेदाराला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सदर सफाई कामगारांना यापुढेही चालू वेतन, इतर असणार्‍या सुविधा उपलब्ध होणार आहेत, असे मत स्पिडी प्रकल्पाचे व्यवस्थापक अधिकारी राकेश कोळी यांनी व्यक्त केले. या स्थानिक ठेकेदाराची नियुक्ती 1 ऑगस्ट 2019 पासून स्पिडी प्रकल्पात करण्यात आली असून प्रकल्पातील 47 सफाई कामगार यापुढे सदर स्थानिक ठेकेदाराच्या अखत्यारीत स्पिडी मल्टीमोडल या प्रकल्पात सफाई कामगार म्हणून काम करणार आहेत, तसेच यापुढेही सदर सफाई कामगारांना पळून गेलेला ठेकेदार देत असणारे चालू वेतन, तसेच इतर सुविधा ठेकेदाराच्या माध्यमातून मिळणार आहेत आणि त्या सुविधा उपलब्ध न झाल्यास उपलब्ध करून देण्याचे काम स्पिडी प्रकल्पाचे व्यवस्थापक अधिकारी करतील, असा विश्वास शेवटी स्पिडी मल्टीमोडल प्रकल्पाचे व्यवस्थापक अधिकारी राकेश कोळी यांनी दिला आहे.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply