Breaking News

लालूपुत्र ड्रग्जच्या आहारी? ऐश्वर्याचा आरोप

पटना : वृत्तसंस्था

बिहारचे माजी आरोग्यमंत्री तेजप्रताप यादव यांना ड्रग्जचे व्यसन असल्याचे त्यांची पत्नी ऐश्वर्या राय यांनी  म्हटले आहे. तेजप्रताप यादव यांच्यासोबत घटस्फोट घेण्यासाठी ऐश्वर्या राय यांनी कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात तेजप्रताप यादव गांजा ओढत असल्याचे तसेच नशेत घागरा आणि चोळी परिधान करत राधा बनून डान्स करतात, असे ऐश्वर्या राय यांनी म्हटले आहे.

कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी ऐश्वर्या यांनी फॅमिली कोर्टात अर्ज दाखल केला असून सुरक्षेची मागणी केली आहे. तसेच ऐश्वर्या यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, लग्नानंतर तेजप्रताप यादव यांना ड्रग्जचे व्यसन असल्याचे माहीत झाले. ते स्वत: ड्रग्ज घेतात आणि नशेत स्वत:ला भगवान शिवाचा अवतार असल्याचा दावा करतात. याशिवाय घागरा-चोळी परिधान करून राधाच्या वेशात सांगतात, ’राधा ही कृष्ण आहे आणि कृष्ण ही राधा आहे’.

याचबरोबर तेजप्रताप यादव यांना असे करण्यास रोखले असता म्हणतात, ’गांजा तर भोलेबाबाचा प्रसाद आहे, त्याला नकार कसे देणार!’ दरम्यान, याबाबत सासरच्या मंडळींना सांगितले असता त्यांच्याकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याचे ऐश्वर्याने म्हटले आहे. तेजप्रताप यादव हे बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. तेजप्रताप आणि ऐश्वर्या यांच्यात पटत नसल्याने लग्नानंतर अवघ्या पाच महिन्यांत त्यांनी घटस्फोटासाठी कोर्टात धाव घेतली. नोव्हेंबर 2018मध्ये तेजप्रताप यांनी पटनाच्या कौटुंबिक कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply