पनवेल : रामप्रहर वृत्त
नावडे येथील जय हनुमान क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आमदार चषक 2023 टेनिस क्रिकेट स्पर्धेत दापोलीच्या जय हनुमान क्रिकेट संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. किरवलीचा ओम नर्मदेश्वर संघ द्वितीय क्रमांक पटकाविला.
नावडे येथील मैदानावर चार दिवस या स्पर्धा पार पडल्या. उत्तम आयोजन आणि क्रिकेटचा थरार या स्पर्धेदरम्यान क्रीडा रसिकांना पहायला मिळाला. या स्पर्धेला पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी भारतीय संघातील आंतरराष्ट्रीय माजी क्रिकेटपटू व आयपीएल प्रशिक्षक संजय बांगर यांची विशेष उपस्थिती लाभली.
या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या जय हनुमान दापोली संघास एक लाख रुपये व आकर्षक चषक, उपविजेत्या किरवलीच्या ओम नर्मदेश्वर संघास 50 हजार रुपये व चषक तसेच तृतीय क्रमांक प्राप्त करणार्या गावदेवी खर्डी संघाला आणि चतुर्थ क्रमांक मिळविलेल्या दक्षता 11 कानपोली संघाला प्रत्येकी 25 हजार रुपये व आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेत मालिकावीराचा मान ओम नर्मदेश्वर संघाच्या मंगेश पाटील या अष्टपैलू खेळाडूने पटकाविला. त्याला रेफ्रिजिरेटर बक्षीस देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजक व प्रसिद्ध क्रिकेटपटू प्रशांत खानावकर व सहकार्यांनी विशेष मेहनत घेतली.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …