मुंबई ः प्रतिनिधी
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वन डेत टीम इंडियाने शानदार कामगिरी करीत विजयी सलामी दिली असली तरी या सामन्यात भारताला दोन धक्के बसले. भारतीय संघ फलंदाज करताना सलामीवीर रोहित शर्माला दुखापत झाली. त्यानंतर गोलंदाजी करताना एक चेंडू अडवण्याचा प्रयत्न करताना श्रेयस अय्यरही दुखापतग्रस्त झाला. मिळालेल्या माहितीनुसार तो इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित दोन वन डे सामन्यांसह आयपीएललाही मुकण्याची शक्यता आहे.
इंग्लंडच्या डावातील आठव्या षटकात शार्दुल ठाकूरला जॉनी बेयरस्टोने शॉट मारला. हा चेंडू अडवण्यासाठी श्रेयसने हवेत झेप घेतली. यामुळे इंग्लंडला चारऐवजी फक्त दोन धावा मिळाल्या, पण श्रेयसच्या खांद्याला मार बसला. त्यानंतर सपोर्ट स्टाफच्या मदतीने तो मैदानाबाहेर गेला. दुखापत गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर श्रेयसला रुग्णालयात नेण्यात आले.
श्रेयस आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करतो. गेल्या वर्षी त्याच्या नेतृत्वाखाली संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती.
Check Also
शेकापचा माजी नगरसेवक सुनील बहिराच्या पोलीस कोठडीत वाढ
पनवेल : रामप्रहर वृत्त प्रॉपर्टीसाठी मयत वडिलांचे खोटे शपथपत्र बनवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पनवेल तक्का …