Breaking News

कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांसाठी मजगाव ग्रामपंचायतीतर्फे मदतफेरी

मुरुड : प्रतिनिधी

महापुरामुळे कोल्हापूर -सांगली भागात खूप मोठी हानी झाली.  त्या पूरग्रस्तांना मदत मिळावी, या हेतूने मजगाव (ता. मुरुड) ग्रामपंचायतीने मदत फेरीचे आयोजन केले होते. ग्रामपंचायत हद्दीतील 14 विविध समाज संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी या मदत फेरीत सहभागी झाले होते. ते मदत फेरीतील दानपेटीत शक्ती पैसे टाकण्याचे आवाहन करीत होते. 

 मजगाव बाजारपेठ, मुस्लिम मोहल्ला, मासळी मार्केट, विविध पाखाड्यांत ही मदत फेरी काढण्यात आली. सरपंच पवित्रा चोगले, उपसरपंच प्रीतम पाटील, ग्रामपंचायत सदस्य अमित कोळी, माजी सभापती चंद्रकांत कमाने, माजी सरपंच संतोष जमनू, सुनील गोसावी, संतोष बुल्लू,

इम्तियाज मलबारी, सिराज झोबडकर, बालक गुरुजी, एजाज सुभेदार, माजी उपसरपंच योगेंद्र गोयजी, कृष्णा अंबाजी, उमेश कोंडाजी, किशोर कार्लेकर, मिथुन भोईर यांच्यासह ग्रामस्थ या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या मदत फेरीमधून 50 हजार रुपयांचा निधी संकलित झाला असून, तो मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीला देण्यात येणार आहे. त्यासाठी हा निधी मुरूड तहसीलदारांकडे सुपूर्द करण्यात येईल.

-प्रीतम पाटील, उपसरपंच, ग्रामपंचायत मजगाव, ता. मुरूड

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply