Breaking News

श्रीगाव येथे गोपाळकाला उत्साहात साजरा

श्रीगाव : प्रतिनिधी

गोविंदा आला रे आला, एक दोन तीन चार श्रीगावची पोरं हुश्शार, अशा गजरात शनिवारी (दि. 24) अलिबाग तालुक्यातील श्रीगाव येथे गोपाळकाला उत्साहात साजरा झाला. त्यामध्ये लहान-थोरांसह महिलासुध्दा सहभागी झाल्या होत्या. या वेळी गावातील  एकूण 46 दहीहंड्या फोडण्यात आल्या.

म्हसळा तालुक्यात 852 ठिकाणी गोपाळकाला

म्हसळा :  प्रतिनिधी

गोपाळकाला उत्सवानिमित्त शनिवारी म्हसळा शहरासह तालुक्यात 852 दहीहंड्या फोडण्यात आल्या. शहरातील ब्राह्मण आळी, सोनार-तांबट आळी, वाणी-शिंपी (पेठकर समाज) व्यापारी मंडळ, कुंभार आळी (परीट आळी) असा सर्वत्र गोविंदा उत्सव पार पडला. खरसई गावातील दहीहंडी सर्वांत आकर्षक होती. देऊळ आळी, कोळीवाडा, मधली आळी, डुंगी, कातळ आळी येथील गोविंदा डुंगी आळीतील राम मंदिराजवळ एकत्र येतात. तेथेही दहीहंडी बांधण्यात आली होती. तालुक्यातील सर्व गावांत म्हसळा, गोरेगाव, दिघी सागरी, श्रीवर्धन पोलीस ठाण्यातर्फे होमगार्डच्या मदतीने चोख बंदोबस्त ठेवला होता.

माणगाव तालुक्यात दहीकाला उत्साहात

माणगाव : प्रतिनिधी

तालुक्यात सर्वत्र दहीकाला उत्सव शनिवारी (दि.24)  उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी गोिंवंदा रे गोपाळाच्या तालावर एकावर एक मानवी थर रचून तालुक्यात अनेक दहीहंड्या फोडण्यात आल्या. माणगाव तालुका युवासेना अधिकारी कपिल गायकवाड यांच्या खांदाड येथील निवासस्थानी बांधण्यात आलेली दहीहंडी पाच मानवी थर रचून ज्ञानदेव पवार मित्रमंडळाच्या गोविंदा पथकाने पहिल्याच प्रयत्नात फोडली.

नचिकेताज हायस्कूलमध्ये दहीहंडी

मुरूड : प्रतिनिधी

येथील नचिकेताज हायस्कूलमध्ये शनिवारी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडण्याचा आनंदसुद्धा घेतला. संचालिका मुग्धा दांडेकर, नगरसेवक मंगेश दांडेकर, माजी नगरसेवक नितीन पवार, नृत्य निर्देशक अमोल कापसे, मुख्याध्यापक योगेश तटक यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply