Breaking News

पोशीरमध्ये दहीहंडीचा जल्लोष

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील पोशीरमध्ये दहीहंडी फोडण्याकरिता गोविंदा पथकांनी शनिवारी उत्साहात हजेरी लावली होती. या वेळी गावातील एकमेव बँड पथकाने आखाडा भागात संगीतमय सलामी दिली. त्यामुळे प्रेक्षकांच्या आनंदात आणखी भर पडली.

पोशीरमधील आखाडा (जांभूळपाडा), वरची आळी, खालची आळी, चाफा आळी आदी भागांत दहीहंडीचा उत्साह होता. गावातील लिये परिवाराच्या दहीहंडीबद्दल कुतूहल असते. शुक्रवारी रात्री जागरण, भजन करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला, तर शनिवारी सकाळी पूजाविधी करून काला करण्यात आला. गावकीच्या इमारतीसमोरील दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदांचा उत्साह शिगेला पोचला होता. ही दहीहंडी गोविंदांनी चार थर लावून दुसर्‍याच प्रयत्नात फोडली. रामचंद्र राणे व विरले गुरुजी यांच्या घरासमोरील हंडी फोडण्यास थोडा वेळ लागला, पण गोविंदांनी मनोर्‍यांचा आनंद घेत ही हंडीदेखील चार थर लावून फोडली. आखाडा येथील खडकावरील हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांनी प्रयत्नांची शिकस्त केली. या वेळी  गावातील नव्याने तयार करण्यात आलेल्या बँड पथकाने दहीहंडीस संगीतमय सलामी दिली. हाबळे आळीतील कलमी आंब्याखालील दहीहंडी बाल गोविंदा पथकाने फोडली. नेरळ पोलिसांनी या वेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply