Breaking News

बलात्कारी राम राहीमला दणका

हायकोर्टाने फेटाळला पॅरोल

चंदीगड ः वृत्तसंस्था

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम बलात्कारप्रकरणी सध्या तुरुंगात असून त्याचा पॅरोल पंजाब व हरियाणा हायकोर्टाने मंगळवारी (दि. 27) फेटाळला आहे. राम राहीमच्या पत्नीने पॅरोल अर्ज हायकोर्टात दाखल केला होता. त्यावर मंगळवारी सुनावणी पार पडली असून हायकोर्टाने दणका देत पॅरोल फेटाळून लावला आहे.

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला बलात्कारप्रकरणी 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ऑगस्ट 2018मध्ये सुनावण्यात आली होती. न्यायालयाने बाबा राम रहीमला दोषी ठरवले होते. दोषी ठरवल्यानंतर झालेला हिंसाचार लक्षात घेता तुरुंगातच न्यायालय भरवून शिक्षा सुनावण्यात आली. निकाल सुनावण्यासाठी न्यायाधीशांना विशेष हेलिकॉप्टरने रोहतकच्या तुरुंगात आणण्यात आले होते. राज्यातही प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला. दरम्यान, त्या वेळी न्यायालायने 10 वर्षांची शिक्षा सुनावली होती. राम रहीम कोर्टरूममध्ये हात जोडून उभा असून दयेसाठी याचना करीत होता. 2002मध्ये हे बलात्कार प्रकरण उजेडात आले होते.

Check Also

पनवेल मनपा हद्दीतील पाणीपुरवठ्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली पाहणी

सर्व कामे 31 मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे …

Leave a Reply