Breaking News

माथेरानमध्ये मिशन मास्क अभियान; पर्यटकांची तपासणी

कर्जत : बातमीदार

ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी माथेेरान नगरपालिकेने शहरात मिशन मास्क अभियान सुरू केले आहे. या अभियानात चेहर्‍यावर मास्क नसलेल्या नागरिकांकडून दंड वसुली करण्यात येत आहे. माथेरानमध्ये ओमायक्रॉनचा प्रदुभाव वाढू नये यासाठी नगरपालिकेने कंबर कसली आहे. यासाठी  मिशन मास्क अभियान राबविले जात आहे. दवंडी देवून  नागरिकांना सतर्क केले जात आहे. चेहर्‍यावर मास्क नसलेल्या नागरिकांचा फोटो काढून त्यांच्याकडून दंड वसुली करण्यात येत आहे. स्थानिकांपासून पर्यटकांपर्यंत ही दंड वसुली केली जात आहे. स्वतः मुख्याधिकारी सुरेखा भणगे व नगरध्यक्षा प्रेरणा सावंत या  नागरिकांना सतर्क करताना दिसत आहेत. माथेरानच्या वेगवेगळ्या भागात पथके तयार करून मास्क लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच न ऐकणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करत आहेत.

 

माथेरान कोरोनापासून दूर ठेवण्यात यश आले आहे ते फक्त नागरिकांच्या सतर्कतेमुळे. यापुढेही सर्वांनी मास्कचा वापर करावा. पर्यटकांनीही मास्कचा वापर करावा.

 -सुरेखा भणगे, मुख्याधिकारी, माथेरान नगरपालिका

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply