पनवेल : रामप्रहर वृत्त
शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामार्फत पनवेलमध्ये जिंकायचे असेल, तर या आघाडीने पनवेल विधानसभेची उमेदवारी कांतीलाल कडू यांना देण्याशिवाय पर्याय नाही. ते एकमेव मजबूत उमेदवार असून, त्यांना आता आमदारकीची स्वप्ने पडतात. कांतीलाल कडू यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीकडे विधानसभा उमेदवारीसाठी मुलाखत दिली आहे. आता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याबद्दल काय मत आहे तेही कडू यांच्याकडे चर्चा करून कळविले आहे.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, महासचिव भूपेंद्र यादव आणि राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेतेमंडळींनी संपूर्ण कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व विभाग कार्यकर्त्यांचे संमेलन रविवारी (दि. 15) पनवेलमध्ये घेऊन भाजप अधिक मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन केले. आता कांतीलाल कडू भाजपचे हे संमेलन शिवसेनेविरुद्ध होते, अशा अफवा पसरवायला मागेपुढे पाहणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. जसे आम्ही संमेलन घेतले, तशा शिवसेनेनेही खारघर, कामोठे, कळंबोली येथे पक्ष मजबुतीकरिता बैठका घेतल्या, तर त्यांचे काय चुकले?
राहिला प्रश्न उपजिल्हा रुग्णालयाच्या भूमिपूजन समारंभाचा आणि तुमच्या शंकांचा व आरोपांचा, तर स्वत:ची ‘लाल’ करणार्या वेड्या माणसाच्या प्रत्येक गोष्टीकडे समंजस माणसाने लक्ष न दिलेलेच बरे असे म्हणतात. सहा महिन्यांपूर्वी आम्ही चांगले कोण व वाईट कोण ते विधानसभेच्या निकालानंतर समजेल, असे म्हटले होते. आता फक्त एक महिन्याचाच प्रश्न आहे. कावळ्याच्या शापाने..