Breaking News

जलतरण स्पर्धेत रायगडचा ‘स्ट्रोक’

10 जणांकडून 45 पदकांची लयलूट

अलिबाग : प्रतिनिधी

अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील स्पर्धकांनी वर्चस्व प्राप्त केले आहे. 10 जणांनी तब्बल 45 पदकांची कमाई केली.

महाराष्ट्र राज्य मास्टर्स एक्वेटिक असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा 13 व 14 सप्टेंबर रोजी अमरावती येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून सुमारे 300 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन अमरावतीचे महापौर संजय नरवले व महाराष्ट्र राज्य मास्टर्स एक्वेटिक असोसिएशनचे  डॉ. प्रकाश अजमिरे यांच्या हस्ते झाले.

स्पर्धेत रायगडच्या संकेत म्हात्रे याने 4 सुवर्ण व 2 रौप्य, दीपक ठाकूरने 5 सुवर्ण व 1 रौप्य, हितेश भोईरने 5 सुवर्ण व 1 कांस्य, महादेव तावरेने 5 सुवर्ण, सचिन शिंगरूतने 3 सुवर्ण व 3 रौप्य, महेंद्र पाटेकरे 3 सुवर्ण व 1 रौप्य, ओमकार कोळीने 1 सुवर्ण, 2 रौप्य व 2 कांस्य, समर्थ नाईकने 1 सुवर्ण, 1 रौप्य व 2 कांस्य, केदार केतकरने 1 सुवर्ण व 1 रौप्य, किरण मढवीने 1 सुवर्णपदक पटकाविले. या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply