पनवेल : प्रतिनिधी
मतदारसंघ कोणताही असो त्या ठिकाणी आपले संघटन मजबूत करा, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी रविवारी (दि. 15) येथे केले. ते भारतीय जनता पक्षाच्या ठाणे व कोकण विभाग कार्यकर्ता संमेलनात बोलत होते. सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्य अहवालाचे या वेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
पनवेल येथील विरुपाक्ष मंगल कार्यालयात ठाणे व कोकण विभाग कार्यकर्ता संमेलन भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या संमेलनास भाजपचे राष्ट्रीय महासचिव खासदार भूपेंद्र यादव, संघटन महामंत्री व्ही. सतीश, प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणिक, सतीश धोंड, खासदार कपिल पाटील, मनोज कोटक, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार सर्वश्री नरेंद्र पवार, किसन कथोरे, मंदा म्हात्रे, निरंजन डावखरे, रमेश पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, महेश चौगुले, कुमार ऐलानी, हेमंत म्हात्रे, पासकल धनारे, संदीप लेले, नरेंद्र मेहता, रामचंद्र घरत, दयानंद चोरगे, संतोष शेट्टी, महापौर डॉ. कविता चौतमोल आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी जे. पी. नड्डा यांनी संमेलनात उपस्थित असलेल्या ठाणे व कोकण विभागातील 39 विधानसभा क्षेत्रातील लोकप्रतिनिधींना महाराष्ट्रात येत्या काळात होणार्या विधानसभा निवडणुकीसाठी मार्गदर्शन केले. मतदारसंघ कोणाचाही असो, त्या ठिकाणी बूथ अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांची नेमणूक करून संघटन मजबूत करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी मागील पाच वर्षांत केलेल्या उत्तुंग कार्याचा आढावा घेणारा अहवाल नड्डा व अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.