Breaking News

ई-टॉयलेट्सला महाडकरांची नापसंती ; वापराचे ज्ञान नसल्याने अडचणी

महाड ः प्रतिनिधी

महाड नगरपालिकेने महाड व परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी उभारलेल्या ई-टॉयलेट्सला सध्यातरी नागरिकांनी नापसंती दर्शवली आहे. त्यातच वापराचे ज्ञान नसल्याने, तसेच आत अडकण्याच्या घटना घडल्याने अनेक जण भीतीने याचा वापर करीत नाहीत. त्यातच या ई-टॉयलेट्सची जागादेखील चुकली असल्याचे नागरिक सांगत आहेत.

महाड नगरपालिकेने स्वच्छता अभियानात उत्तम कामगिरी केल्यानंतर देशामध्ये चांगले नाव कमावले व पुरस्कारही मिळवले. अशाच स्वच्छता अभियानामध्ये एक पाऊल पुढे टाकण्यासाठी पालिकेने महाड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या लायन्स क्लब या ठिकाणी दोन ई-टॉयलेट्सची उभारणी केली आहे. मोठ्या शहरांत असणारी ही टॉयलेट्स महाडमध्ये पालिकेने उभी करून आधुनिकतेकडे पाऊल टाकले खरे, पण या ई-टॉयलेटकडे नागरिकांनी सपशेल पाठ फिरवली आहे. या ई-टॉयलेटची स्वच्छता आधुनिक पद्धतीने होत असली तरी त्यात दुर्गंधी असल्याचे काहींनी सांगितले.

बाजारपेठ आणि इतर सरकारी कार्यालये असल्याने बाहेरगावाहून येणार्‍या नागरिकांची व प्रवाशांची येथे कायम वर्दळ असते. महाडमध्ये छ. शिवाजी चौक येथे स्वच्छतागृह आहे, मात्र या ठिकाणी स्वच्छतेच्या नावाने बोंब आहे. नागरिकांची गैरसोय होत होती. स्वच्छतागृहाची असणारी गरज लक्षात घेता पालिकेने या ठिकाणी दोन ई-टॉयलेट्स बांधली आहेत.

टॉयलेट कशी वापरावी याबाबत अडचणी येत आहेत. हे लक्षात घेता या ठिकाणी केअर टेकर नेमण्याच्या

मनस्थितीत

नगरपालिका आहे.

-सुहास कांबळे

(नगर अभियंता, नगर परिषद)

असे आहे ई-टॉयलेट

ई-टॉयलेटच्या ठिकाणी बॉक्समध्ये पाच रुपयांचे नाणे टाकल्यानंतर दरवाजा उघडण्यापासून ते पूर्ण स्वच्छता करण्यापर्यंत सर्व कामे स्वयंचलित यंत्रणेने

होत असतात.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply