Breaking News

पनवेलचा मयूर नाईक ‘सुपर डुपर हिट 2019’ पुरस्काराचा मानकरी

पनवेल : प्रतिनिधी

रसिकांच्या मनावर कायम अधिराज्य गाजवणार्‍या लोकगीते, कोळीगीतांची पर्वणी देणार्‍या कृणाल म्युझिक या नामांकित संगीत कंपनीचा ‘2019 सुपर डुपर हिट गाण्याचा पुरस्कार’ पनवेलमधील गायक ‘लिंबू कापला’फेम मयूर नाईक यांनी पटकाविला आहे.

लोअर परेल येथील अल्ट्रा मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या स्टुडिओमध्ये कृणाल अल्ट्रा म्युझिकचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक जयेश विरा, निर्माता संचालक सुमित अग्रवाल, सुरेश पितळे यांच्यासह संगीतकार, गायक, गीतकार व इतर मान्यवर उपस्थित होते.

मयूर नाईक पनवेल तालुक्यातील नांदगाव गावाचा सुपुत्र आहे. त्याने गायलेल्या ‘लिंबू कापला रस गळू लागला’ या गाण्याने आजच्या आधुनिक युगात आगामी पिढीला पारंपरिक, तसेच आगरी कोळी गाण्यांचे दर्शन घडविण्याचे काम केले. या गाण्याला यूट्युब, इंस्टाग्राम व इतर माध्यम मिळून तब्बल 72 लाख रसिकांनी दाद दिली. या सुपरडुपर गाण्याची दखल घेत कृणाल म्युझिक कंपनीने मयूर नाईक यांचा पुरस्काराने सन्मान करून पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply