Breaking News

महेंद्रसिंह धोनी चॅम्पियन : गांगुली

मुंबई : प्रतिनिधी

अष्टपैलू फलंदाज महेंद्रसिंह धोनी चॅम्पियन आहे आणि चॅम्पियन कधी लवकर मैदान सोडत नाहीत, अशा शब्दांत बीसीसीआयचे नवे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी धोनीच्या निवृत्तीच्या चर्चेवर प्रतिक्रिया व्यक्त केली.

बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गांगुली म्हणाला की, मी धोनीशी चर्चा करणार आहे. माझी अद्याप धोनीशी भेट झालेली नाही, मात्र त्याच्याशी चर्चा करून त्याच्या भविष्यातील योजना जाणून घेण्यात येतील. धोनी चॅम्पियन आहे आणि चॅम्पियन कधी लवकर मैदान सोडत नाहीत, असे त्याने स्पष्ट केले. या वेळी त्याने स्वत:चे उदाहरणही दिले. मला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातून दीड वर्ष बाहेर रहावे लागले होते, मात्र त्यानंतर मी संघात जोरदार पुनरागमन केले आणि दोन वर्ष मैदानावर तळ ठोकला, असंही त्याने सांगितले.

या वेळी गागुंलीने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली. भारतीय क्रिकेटला उंचीवर घेऊन जाण्याची विराटमध्ये क्षमता आहे, असे तो म्हणाला.

Check Also

उत्तर रायगड भाजपमध्ये संघटनात्मक नियुक्त्यांची घोषणा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्ह्यांतर्गत मंडळ, विविध मोर्चे, आघाडी आणि सेलच्या …

Leave a Reply