Breaking News

आरोग्याची काळजी घ्या : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी

रेवदंडा : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी जनतेला आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. आप्पासाहेबांनी व्हिडीओ क्लिपद्वारे नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे सूचित केले आहे.
शासनाचे आरोग्यदूत असलेल्या डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी म्हटले आहे की, सध्या जगभरात प्रादुर्भाव झालेल्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जनतेने वेळोवेळी आपले हात स्वच्छ धुवावेत. त्यासाठी हॅण्ड सॅनिटायझरचा समावेश वापर करावा, गर्दीत जाणे टाळावे, हस्तांदोलन करण्याऐवजी हात जोडून अभिवादन करावे, या कठीण प्रसंगाची भीती न बाळगता आवश्यक ती काळजी घ्यावी, जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता शासनाकडून वेळोवेळी करण्यात येणार्‍या सूचनांचे तंतोतत पालन करावे आणि घरातच राहून पोलिसांना सहकार्य करावे.  आपण सर्व मिळून कोरोनावर मात करू, असा विश्वासही आप्पासाहेबांनी शेवटी व्यक्त केला आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply