मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील अनेक संस्था आणि मंदिर ट्रस्ट कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपले आर्थिक योगदान देत आहेत. रयत शिक्षण संस्थेनेही पुढाकार घेत दोन कोटी रुपयांची मदत राज्य सरकारच्या मुख्यमंत्री सहायता निधीत दिली आहे.
कोविड-19 या जागतिक महामारीचा सामना देश मोठ्या धैर्याने करत आहे, मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आल्याने एक नवे आर्थिक संकट उभे राहिले आहे. या परिस्थितीत सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेतून रयत शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांच्या एक दिवसाच्या वेतनाइतकी सुमारे दोन कोटी रुपये रक्कम धनादेशाद्वारे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19मध्ये जमा करण्याचा निर्णय एकमुखाने घेतला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली.
कोरोनापासून बचावासाठी सरकारने लॉकडाऊन व संचारबंदी केली असून, मदतीचे आवाहनही करण्यात आलेले आहे.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper