Breaking News

आला पावसाळा आरोग्य सांभाळा!

दीर्घकाळ भिजलेल्यावर बुरजीजन्य संसर्गाचा धोका; लक्षणांकडे दुर्लक्ष नको; डॉक्टरांनी दिला इशारा

नवी मुंबई : बातमीदार

डोळ्यांच्या किंवा त्वचेच्या संसर्गाप्रमाणेच कानाच्या संसर्गाचे वाढते प्रमाण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पहायला मिळते. हा संसर्ग कानाच्या आतील, मध्य किंवा बाह्य  भागावर परिणाम करू शकतो. पावसात दीर्घकाळ भिजणार्‍या व्यक्तींमध्ये कानात बुरशी होण्याचे प्रमाण वाढत असून स्वतःच्या मर्जीने कानात औषध टाकणे अथवा बुरशी काढण्याचे प्रयत्न करणार्‍या रुग्णांना त्यापासून अधिक धोका असल्याचा इशारा तज्ञांनी दिला आहे.

अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. अंकित जैन सांगतात की, कानातील ओलावा अथवा कानात सतत पाणी जात असल्यास अशी स्थिती बुरशीच्या वाढीस पोषक ठरते. परिणामी काळ्या-पांढर्‍या रंगाची ही बुरशी कानात वाढते. सुरुवातीस प्रमाण कमी असल्याने ती दिसून येत नाही, मात्र त्यावर योग्य उपचार न झाल्यास कानाच्या वेदना असह्य होतात.

मान्सूनमुळे उष्णतेपासून नक्कीच दिलासा मिळतो पण त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्याही उद्भवू शकतात. पावसाचे दूषित पाणी कानात शिरून बुरशीजन्य संसर्गास आमंत्रण देऊ शकते. वातावरणातील वाढलेली आर्द्रता बुरशीजन्य संसर्गास कारणीभूत असलेल्या जीवाणूंसाठी प्रजनन स्थळ ठरू शकते. कानात इअरबड्स घातल्याने  होणार्‍या जखमांमुळेदेखील तुम्हाला कानात संसर्ग होण्याची शक्यता असते. ओटोमायकोसिस नावाचा कानाचा बुरशीजन्य संसर्गदेखील कानाला त्रास देतो. संसर्गाची इतर कारणे सर्दी किंवा फ्लू आणि अगदी ऍलर्जी अशीदेखील असू शकतात असे डॉ जैन सांगतात. शिवाय, स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया आणि हिमोफिलस इन्फ्लूएंझा यांसारखे जीवाणू कानाच्या संसर्गास कारणीभत ठरणारे मुख्य घटक आहेत. जरी बॅक्टेरियाच्या संसर्गाची प्रकरणे वर्षभर होत असली तरी पावसाळ्यात त्यांची मोठ्या प्रमाणात वाढ होते.

कान बंद होणे, जळजळ होणे, सूज येणे, खाज सुटणे, कान दुखणे, ऐकणे कमी येणे, कानातून पाण्यासारखा स्त्राव, चक्कर येणे, तीव्र डोकेदुखी आणि ताप येणे अशी लक्षणे दिसून आल्यास दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या जेणेकरुन तो औषधोपचार आणि कानात घालता येतील अशी औषधे लिहून देतील. कान स्वच्छ होईल आणि बुरशी काढून टाकली जाईल. आंघोळीनंतर कान स्वच्छ आणि कोरडे ठेवणे आवश्यक आहे. तर इअरवॅक्स काढण्यासाठी इअरबड्स वापरणे टाळाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

पावसाळ्यात थंड आणि आंबट पदार्थ खाणे टाळा. जर तुम्हाला घशात संसर्ग झाला असेल तर चहा, कॉफी किंवा सूप प्यायल्याने कानात संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. मीठ-पाण्याच्या गुळण्या केल्याने घशाचा कोणताही संसर्ग टाळता येईल. तसेच आंघोळीनंतर कानाचा बाहेरील भाग स्वच्छ कपड्याने स्वच्छ करा व इयरफोन स्वच्छ केल्याची खात्री करा, हे कानाते संक्रमण टाळेल. ज्या क्षणी तुम्हाला वेदना किंवा कोणत्याही प्रकारची अस्वस्थता जाणवेल, तेव्हा जा आणि डॉक्टरांशी बोला. फक्त डॉक्टरांच्या सूचनेनुसार कानाचे थेंब वापरा आणि स्वत:ची औषधोपचार टाळा. सर्दी झाल्यास सतत नाक शिकरणे टाळा, यामुळे कानाचा संसर्ग होतो. शक्य असल्यास साध्या पाण्याची वाफ घ्या.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply