Breaking News

म्हसळा तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींतील 10 हजार 369 घरांचे सर्वेक्षण पूर्ण

म्हसळा ः प्रतिनिधी

म्हसळा तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींमधील 10,369 घरांतून विविध निकषाने सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती पं. स. गटविकास अधिकारी तथा नोडल अधिकारी वाय. एन. प्रभे यांनी दिली.

तालुक्यातील आंबेत, रोहिणी, आडी, महाड खाडी, भेकरेचा कोंड, खारगाव (बु.) पाभरे, निगडी, कांदळवाडा, खरसई, मेंदडी, रेवली, वरवटणे, गोंडघर, खारगाव (खुर्द), कणघर, लेप, कोळे, नेवरूळ, जांभूळ, घूम, साळविंडे, मांदाटणे, ठाकरोली, कोळवट, केलटे, तोंडसुरे, घोणसे, खामगाव, कुडगाव, संदेरी, लीपणीवावे, चिखलप, तोराडी, पांगळोली, वारळ, फळसप, तुरुंबाडी, काळसुरी, देवघर या ग्रामपंचायतींतील वाडी-वस्तीवर जाऊन आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, तलाठी, ग्रामसेवक शिक्षकांच्या माध्यमातून 10 मार्चनंतर परदेशातून प्रवास करून गावात आलेल्यांची माहिती, ते कोणकोणत्या देशातून आले, मूळ रहिवासी, घरामध्ये अलगीकरण असा शिक्का आहे का?, 60 वर्षांवरील आलेले परदेशी नागरिक अशा विविध स्तरावरून नोंदी घेऊन ग्रामपंचायत स्तरावरील नोंदी तालुका स्तरावरील नोडल ऑफीसर व जिल्हा स्तरावर पाठविण्यात आल्या आहेत.

-ग्रामपंचायत पातळीवरील

सर्वेक्षणात 55 आशा वर्कर, 110 अंगणवाडी सेविका, 86 मदतनीस, 184 मुख्याध्यापक व प्राथमिक शिक्षक, 17 ग्रामसेवक, 10 तलाठी व सरपंच, पोलीस पाटील यांच्या मदतीने प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीतील घरांतील नागरिकांचे सर्वेक्षण केले.

-वाय. एन. प्रभे, गटविकास अधिकारी तथा नोडल अधिकारी

-कोरोनाशी खेळ करू नका. वेळीच सावध व्हा. आपल्या कुटुंबाला, गावाला, तालुक्याला, जिल्ह्याला वाचवा. शासनाचे आणि संचारबंदीचे नियम पाळा. तालुक्यात घरामध्ये अलगीकरण केलेल्या नागरिकांची मुदत संपत आहे. घरातून बाहेर पडू नका. घरातच राहा, सुरक्षित राहा. -डॉ. गणेश कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी, म्हसळा

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply