पेण ः पेणमधील आनंदनगर येथे कोरोना प्रादुर्भावाच्या संशयावरून जमावाकडून एका दाम्पत्याला घराबाहेर काढून दमदाटी करण्यात आल्याची घटना घडली. रविवारी सकाळी फिर्यादी रा. आनंदनगर रामवाडी, पेण यांचे पती हे 25 मार्चपासून रजेवर होते. ते फिर्यादी राहत असलेल्या रामवाडी या ठिकाणी राहण्यास आले असता त्यांच्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होईल असा गैरसमज करून सोसायटीत राहणार्या सहा जणांनी जमावबंदी असतानाही बेकायदेशीर जमाव करून फिर्यादीच्या घरासमोर त्यांना दमदाटी केली. यानंतर फिर्यादीला घरातून बाहेर काढून रूमला लॉक लावले. या प्रकरणी फिर्यादींनी पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …