Breaking News

कर्जतमध्ये पंप चोरीप्रकरणी दोघांना अटक

कर्जत : प्रतिनिधी

बोरिंगच्या पंपांची चोरी करणार्‍या दोघाजणांना कर्जत  पोलिसांनी ताब्यात घेतले असून,अधिक तपासात त्यांच्याजवळ ठासणीची बंदूक सापडली. दोघांना मुद्दे मालासह कर्जत पोलिसांनी अटक केली आहे.

कर्जत तालुक्यातील भालिवडी गावाच्या हद्दीमध्ये घराचे बांधकाम चालू असलेल्या ठिकाणावरून काही दिवसांपुर्वी दोन बोरिंगचे पंप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. खबर्‍याकडून माहिती काढून कर्जत पोलिसांनी  गुन्ह्यातील संशयित आरोपी करण भरत थेर (रा. सापेले, ता. कर्जत) आणि विशाल प्रसाद भोईर (रा. वंजारवाडी, ता. कर्जत) यांना ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. त्यानंतर सदर आरोपींना न्यायालयाकडून पोलीस कोठडी  घेऊन गुन्ह्यातील चोरून नेलेले 18 हजार रुपये किमतीचे दोन बोरिंगचे पंप जप्त करण्यात कर्जत पोलिसांना यश आले. तसेच त्यांनी या गुन्ह्यात वापरलेली होंडाई कंपनीची कार (एमएच-43,व्ही-6868) जप्त केली. या गाडीच्या डिकीमध्ये लाकडी दस्ता असलेली एक ठासणीची बंदूक सापडली. सदरची बंदूक व कार असा एकूण एक लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक राजू अल्हाट, उपनिरीक्षक सचिन गावडे, अंमलदार सुभाष पाटील, बाबासाहेब जाधव, किरण शेळके, सचिन नरुटे, भूषण चौधरी, अंमलदार अश्रुबा बेंद्रे यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली. पुढील तपास सुरू आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply