उरण : वार्ताहर
उरण तालुका ग्राहक सहकारी संस्था यांचे द्रोणागिरी बाजार हे गेली 27 वर्षे उरण तालुक्यातील सर्व नागरिकांना रास्त भावात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करत आहे. या बाजाराचा लाभ मोठ्या संख्येने ग्राहक घेत आहेत. या बाजाराच्या पूर्वीच्या वेळा सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत व सायंकाळी 4 ते रात्री 8 अशा होत्या. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे या वेळेत बदल करण्यात आला असून ही वेळ सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत होती. करोनोच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे सोमवार, मंगळवार, गुरूवार, शनिवार बाजार सुरू असून बुधवार, शुक्रवार, रविवार या दिवशी पूर्ण दिवस द्रोणागिरी बाजार बंद राहील. शुक्रवार (दि. 17)पासून सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत दुकान सुरु राहील, अशी माहिती द्रोणागिरी बाजाराचे संचालक महेंद्र म्हात्रे यांनी दिली. खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवावे, गर्दी करू नये, द्रोणागिरी बाजार ही सेवाभावी संस्था आहे. आपली सेवा करण्यास आम्ही बांधिल आहोत. घाबरून जाऊ नये, गोंधळ करू नये. समान खरेदी करताना वेळचे बंधन पाळा. दोन ग्राहकांच्या मध्ये पाच फुटाचे अंतर ठेवावे, रांगेचा फायदा सर्वांना आहे, असे द्रोणागिरी बाजाराचे संचालक महेंद्र म्हात्रे यांनी ग्राहकांना आवाहन केले आहे.