नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 17, नवीन पनवेल, सेक्टर 13 येथे भव्य स्वरूपात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. परिसरातील नागरिकांनी या शिबिरात मोठ्या संख्येत उपस्थित राहून आरोग्याची तपासणी करून घेतली. या वेळी प्रभाग समिती सभापती सुशीला घरत, नगरसेविका अॅड. वृषाली जितेंद्र वाघमारे, चारुशीला घरत, राजश्री वावेकर, पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत गोसावी, डॉ. रेहाना मुजावर, डॉ. शुभम पाटील, डॉ. कीर्ती समुद्र आदी उपस्थित होते.