नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढत असली तरी नवी मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जास्त आहे. बुधवारी (दि. 17) नवी मुंबईत तब्बल 102 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन परतल्याने बरे झालेल्यांची एकूण संख्या दोन हजार 457 झाली आहे.
तसेच बुधवारी कोरोनाचा 128 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नवी मुंबईत रुग्णांची संख्या चार हजार 0189 झाली आहे. पाच जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या 129 झाली आहे. सध्या नवी मुंबईतील पालिका तसेच विविध खासगी रुग्णालयांत सद्यस्थितीत एक हजार 603 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यात कोरोनामुक्त होणार्यांची टक्केवारी 50 टक्के असली तरी नवी मुंबईत मात्र ती 59 टक्के इतकी आहे. बुधवारी बाधितांची विभागवार आकडेवारी पाहिल्यास बेलापूर 13, नेरुळ 16, वाशी 17, तुर्भे 22, कोपरखैरणे 27, घणसोली 16, ऐरोली 14, दिघा 3 असा विभागवार रुग्णांचा समावेश आहे.