पनवेल : वार्ताहर, कळंबोली : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यातील तळोजा औद्योगिक वसाहतीत असलेल्या दिप केमिकल्स ऑरगॅनिक कारखान्याला गुरुवारी (दि. 21) दुपारी अचानकपणे आग लागल्याने कारखान्याचे मोठे नुकसान झाले. तर सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.
तळोजा औद्योगिक वसाहतीत असलेल्या दप केमिकल्स ऑरगॅनिक या कारखान्याला गुरुवारी अचानकपणे आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी रवाना झाले व त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही आहे. तसेच आगीचे कारण अद्याप कळले नाही. या घटनेची नोंद तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली.