
पनवेल : ग्रुप ग्रामपंचायत जांभिवलीचे नवनिर्वाचित सरपंच रिया रवींद्र कोंडिलकर यांनी नुकताच पदभार स्वीकारला. त्यांना विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी ज्येष्ठ नेते पांडुरंग केणी, ग्रामपंचायत सदस्य अजय तेजे, माजी सरपंच योगेश लहाने, माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर, महिला अध्यक्षा शिल्पा म्हात्रे, प्रवीण काळबागे, कालुराम माळी, कृष्णा कोंडिलकर, कल्पेश कोंडिलकर, दिलीप कोंडिलकर, ग्रामपंचायत सदस्य अनिता कोंडिलकर, अमित कोंडिलकर, जगदिशभाई, रवींद्र म्हात्रे, सदस्य शेखरभाई आदी मान्यवर उपस्थित होते.