Breaking News

कोपरखैरणे, तुर्भे विभागातील कंटेन्मेंट झोनमध्ये मास स्क्रिनिंग

नवी मुंबई : बातमीदार

कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करताना विशेषत्वाने कोपरखैरणे व तुर्भे विभागात मागील काही दिवसात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन पालिकेने कोपरखैरणे व तुर्भे या दोन्ही विभागातील कंटेन्मेंट झोनमध्ये मास स्क्रिनिंगची मोहीम हाती घेतली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालय आणि तेरणा रूग्णालय यांच्या सहयोगाने हे विशेष कोविड 19 आरोग्य तपासणी शिबिर, सेक्टर 15-16 कोपरखैरणे येथे सुरु करण्यात आले असून याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करीत प्रामुख्याने कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांचे मास स्क्रिनिंग करण्यात येत आहे.

याकरिता तज्ज्ञ डॉक्टरांची 10 वैद्यकीय पथके तयार करण्यात आली आहेत. मंगळवारी सकाळी 10 वाजल्यापासून कोपरखैरणे विभागातील सेक्टर 15, 16 मध्ये कोविड 19 विशेष वैद्यकिय तपासणी शिबिराचा लाभ 400 हून अधिक नागरिकांनी घेतला असून पुढील 27 व 28 मे या दोन दिवशीही याच विभागात स्त्री मुक्ती संघटनेच्या इमारतीतील नागरिकांची तपासणी  केली. त्याचप्रमाणे 29 व 30 मे रोजी कोपरखैरणे सेक्टर 23 तसेच 1 व 2 जून रोजी कोपरखैरणे सेक्टर 12 येथे हे शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.

अशाचप्रकारे तुर्भे विभागात 3 व 4 जून रोजी सेक्टर 21 व 22 मध्ये तसेच 5 व 6 जून रोजी तुर्भे स्टोअर आणि 8 व 9 जून रोजी तुर्भे नाका येथे कंटेन्मेंट झोनमध्ये कोविड- 19 विशेष वैद्यकीय तपासणी शिबिराच्या माध्यमातून मास स्क्रिनिंग केले जाणार आहे. कंटेन्मेंट झोनकडे नवी मुंबई महानगरपालिकेने बारकाईने लक्ष केंद्रित केले आहे. 

नवी मुंबई महानगरपालिका कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी व बाधितांवर सुयोग्य उपचार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. नागरिकांनीही कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी घरातच थांबावे. सोशल डिस्टन्सिंग पाळावे आणि कोरोनाची साखळी खंडीत करावी.

-अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply