
पनवेल : भाजप उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी यांनी वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले. त्याचप्रमाणे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांचीही भेट घेतली. दशरथ म्हात्रे, भूपेंद्र पाटील, संतोष पाटील सोबत होते, तर केणी यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोनामुळे त्रस्त झालेल्या गरीब जनतेला तळोजा फेज 1मध्ये अन्नधान्य तसेच रोगप्रतिकारक गोळ्यांचे वाटप केले. या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख एकनाथ म्हात्रे, भाजप युवा मोर्चा विभागीय अध्यक्ष विनोद घरत, निर्दोष केणी, युवा नेते विवेक केणी, राजेश केणी, प्रसाद पाटील, आशा बोरसे, जयवंत घरत, अविक महादे आदी कार्यकर्त्यांसह महिला भगिनी उपस्थित होत्या.