Breaking News

अलिबागेत पोलीस कवायत मैदानावर प्रजासत्ताक दिन सोहळा

अलिबाग : प्रतिनिधी

भारताचा 71वा प्रजासत्ताकदिन  रविवारी (दि 26) रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.  अलिबाग येथील पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकिय सोहळा पार पडला. पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस दलाने संचलन केले. यावेळी विविध क्षेत्रात उत्तम कार्य केलेल्या व्यक्ती व संस्थांना गौरविण्यात आले. रायगड पोलिसांच्या फिरत्या जनजागृती वाहनाचेही उदघाटन झाले.

या समारंभास रा. जि. प. अध्यक्षा योगिता पारधी, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके आदी मान्यवर उपस्थित होते. रायगड जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय कार्यालये, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, नगर परिषद, नगरपंचायती, महानगरपालिका, सर्व ग्रामपंचायत कार्यालये, शाळा, महाविद्यालये येथेही ध्वजारोहण करण्यात आले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply