पेण ः प्रतिनिधी
पेण तालुक्यातील राजमाची जंगलात विवाहित प्रेमीयुगुलाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
याबाबत माहिती अशी की, परश्या जान्या बांगारा (वय 25, रा. राजमाची वाडी, ता. पेण) आणि पूजा नाना पारध (वय 23, रा. कलोते, ता. खालापूर) यांचे विवाहबाह्य संबंध होते. या दोघांनी 29 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास पेणच्या राजमाची वाडी येथील जंगलात जाऊन एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
पेण पोलीस ठाण्याचे निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक सुरू आहे.
Check Also
लोकनेते दि.बा.पाटील नामकरण कृती समितीतर्फे सर्व आजी माजी आमदारांची लवकरच बैठक
पनवेल : प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात …