पेण : प्रतिनिधी – वडखळ येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत चोरट्याचा चोरी करण्याचा प्रयत्न फसला आहे.
याबाबत माहिती अशी कि, वडखळ पोलीस ठाणे हद्दीतील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत सोमवारी (दि. 29) सायंकाळी 7.15 वाजता ते मंगळवारी (दि. 30) 7.15 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने बँकेच्या उजवे बाजुला असलेल्या भिंतीचे खिडकीची बाहेरील बाजूस खिडकीला सुरक्षीतेच्या दृष्टीने असलेली लोखंडी ग्रील खालच्या बाजूने, लोखंडी शिग व मोठया ट्रकचे टायरचे नट खोलण्याचे पान्याच्या सहाय्याने बाहेरील बाजूस वाकवून खिडकीची स्लायडींग खिडकी उघडुन या खिडकीवाटे बॅकेत प्रवेश करून बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक फौजदार के. ए. पाटील हे करीत आहेत.