Breaking News

नगरसेविका सुशीला घरत यांच्यातर्फे प्रभागात निर्जंतुकीकरणाला सुरुवात

पनवेल : रामप्रहर वृत्त – भाजप नगरसेविका सुशील घरत यांनी स्वखर्चाने पुन्हा एकदा प्रभागात निर्जंतुकीकरण करुन घेण्यात सुरुवात केली आहे. यामध्ये अष्टविनायक  असोशियन,  इंद्रायणी  असोशियन, पील फाय असोशियन, वरदविनायक घरमालक असोशियन येथून  सुरूवात  केली.

समाजसेवा हिच ईश्वर सेवा या वाक्याप्रमाणे मानणारे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रेरणेतून अणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या आशीर्वादाने नगरसेविका सुशीला  घरत व समाजसेवक  जगदीश घरत याच्या प्रयत्नातून अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबवित असतात. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे  वाटप, अर्सेनिक अल्बम गोळ्याचे वाटप, मास्क वाटप असे अनेक कार्यक्रम त्यांनी राबविले. त्याचप्रमाणे आपल्या प्रभागात त्यांनी निर्जंतुकीकरण फवारणी करुन घेतली होती. परंतु पुन्हा एकदा फवारणीचा उपक्रम हाती घेतला असून पुढे देखील सुरु राहिल, असे नगरसेविका घरत यांनी सांगितले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply