खारघर : रामप्रहर वृत्त – जागतिक डॉक्टर दिनाच्या निमित्ताने खारघर शहरातील डॉक्टरांनी कोरोना बाधितांसाठी हॉस्पिटलमध्ये करत असलेल्या कामगिरीबद्दल व त्यांच्या सेवेबद्दल आदर व्यक्त करण्यात आला. या वेळी त्यांना प्रमाणपत्र देत सन्मानित करण्यात आले.
डॉक्टर सर्वच आहेत परंतु सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत आपल्या जीवाची तसेच कुटुंबातील सदस्यांची पर्वा न करत आपण घेतलेले शिक्षण व त्याचा उपयोग समाजाला झाला पाहिजे. ह्या भावनेने व सामाजिक बांधिलकीने रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून कार्यररत असणार्या विविध क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांचा सत्कार बुधवारी (दि. 1) भाजप खारघर तळोजा मंडळ व खारघर भाजप वैद्यकीय सेल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला.
या वेळी भाजपा खारघर तळोजा मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल, वैदयकिय सेल संयोजक किरण पाटील तसेच खारघर डॉक्टर असोसिएशनचे सचिव डॉ. वैभव भदाणे यांनी खालील डॉक्टरांचे त्यांच्या कार्यस्थळी जाऊन प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.
यामध्ये डॉ. अशोक घोडके, डॉ. उद्धव तळणीकर, डॉ. रत्नेश म्हात्रे, डॉ. अजिंक्य भंडारी, डॉ. अतुल खरात, डॉ. सुहास खर्चे, डॉ. उमेश एगल, डॉ. पंकज तितर, डॉ. वैभव भदाने, डॉ. इंद्रजित माने, डॉ. रामकृष्ण क्षार, डॉ. सचिन खोडदे, डॉ. अनिकेत मुळे, डॉ. गजानन चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी या डॉक्टरांचा सर्व खारघर वासीयांना एकच संदेश आहे की, कामा व्यतिरिक्त घराच्या बाहेर पडू नका, सुरक्षित अंतर ठेवा, मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा. तसेच खारघर वासीयांसाठी आरोग्य संबंधित काही तक्रार असल्यास किंवा वैद्यकीय सल्ला हवा असल्यास मोफत टेलिफोनिक सवांदाची सुविधा खारघर डॉक्टर असोसिएशनच्या वतीने उपलब्ध आहे.