Breaking News

अलिबागच्या शर्विका म्हात्रेचा गौरव

आशिया बुक ऑफ रेकॉर्डकडून ग्रँड मास्टर किताब

अलिबाग : प्रतिनिधी
वयाच्या अडीच वर्षांतच भारतातील सर्वांत लहान गिर्यारोहक म्हणून आपले आणि संपूर्ण महाराष्ट्राचे नाव इंडिया ुक ऑफ रेकॉर्डमध्ये सुवर्ण अक्षरांनी कोरलेल्या अलिबाग तालुक्यातील लोणारे गावातील शर्विका म्हात्रे हिच्या कामगिरीची आता आशिया खंडात नोंद झाली आहे. आशिया बुक ऑफ रेकॉर्डने तिला ग्रँड मास्टर हा किता जाहीर केला आहे. वयाच्या तिसर्‍या वर्षी हा  सन्मान मिळवणारी शर्विका ही राज्यातील एकमेव ठरली आहे.
शर्विकाने प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातील सर्वात अवघड समजला जाणारा कलावंतीण सुळका सर करून तिरंगा आणि भगवा ध्वज फडकावला होता. या गोष्टीची दखल घेत सर्व पुरावे आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तिच्या कार्याची दखल घेतली गेली आहे.
शर्विकाला पुढच्या काळात अनेक अवघड किल्ले सर करायचे आहेत. सरलेल्या उन्हाळ्यात ती शंभर दिवसांत शंभर किल्ले सर करणार होती, परंतु कोरोना महामारीमुळे ही मोहीम रद्द करण्यात आली, असे तिच्या पालकांनी सांगितले. दरम्यान, लहान वयात रायगड जिल्ह्याचे नाव रोशन करणार्‍या चिमुरडीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply