Breaking News

विधायक कार्यासाठी शिक्षकांच्या पाठीशी -आमदार प्रशांत ठाकूर

शिक्षक संघाचा वर्धापन दिन सोहळा उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त
अखिल भारतीय प्राथमिक संघ पनवेल शाखेचा शिक्षक संघ वर्धापन दिन सोहळा पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. 7) मोठ्या उत्साहात झाला. या वेळी त्यांनी शिक्षक समाजाचे महत्त्वाचे घटक असून भावी पिढीचे मार्गदर्शक असतात, त्यामुळे शिक्षकांना समाजामध्ये अनन्य साधारण महत्त्व असते, असे प्रतिपादन केले. शिक्षकांच्या विधायक कार्यासाठी सतत पाठीशी राहणार असल्याची ग्वाहीसुद्धा त्यांनी देत सर्व शिक्षकांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
पनवेल शहरातील लोकनेते दि.बा. पाटील मनपा विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ रायगड जिल्हा सरचिटणीस विनोद जोशी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. प्रकाश बिनेदार, पनवेल पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी सीताराम मोहिते, भाजप ओबीसी सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, एन.के. गीते, अंकिता हुद्दार, कीर्ती महाजन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा विजयी मिळवल्याबद्दल वर्धापन दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय प्राथमिक संघाच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
आपल्या भाषणात आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे बोलताना सांगितले की, सन 1954पासून अखिल भारतीय प्राथमिक संघाचे काम अविरतपणे सुरु आहे. शिक्षकाच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांचे कल्याण करण्याचे काम तुम्ही करत आहात. येथील विमानतळाच्या निमित्ताने रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. त्यामुळे भावी पिढीच्या उत्कर्षासाठी शिक्षक म्हणून तुमच्यावर आणखी जबाबदारी आली आहे आणि ती मार्गदर्शक म्हणून तुम्ही यशस्वी कराल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या सोहळ्याच्या माध्यमातून तालुक्यातील 21 केंद्रातून 21 शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर निवृत्त केंद्रप्रमुख व शिक्षकांचा आणि नवनियुक्त केंद्रप्रमुखांचा सत्कार करण्यात आला तसेच विज्ञान प्रदर्शन, क्रीडा व व्यक्तिमत्व विकास स्पर्धा, 100 टक्के शिष्यवृत्तीधारक शाळा, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त, माझी मुख्यमंत्री शाळा सुंदर शाळा, तालुका उत्कृष्ट शाळा पुरस्कार प्राप्त सन्मान व परसबाग विजेती शाळा यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या वेळी गटशिक्षण अधिकारी सीताराम मोहिते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपणही अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचा आजीव सदस्य असल्याचे त्यांनी सांगितले. विनोद जोशी यांनी शिक्षक संघ वर्धापन दिनाविषयी माहिती विषद केली. केंद्र प्रमुख रंजना केणी यांनी संघटनेच्या कारकिर्दीचा आढावा मनोगातून मांडला. उपस्थितांचे आभार प्रदर्शन संजय केणी यांनी मानले.
कार्यक्रमास शिक्षक संघाचे पनवेल शाखा अध्यक्ष धनंजय केणी, कार्याध्यक्ष प्रेमलाल धोबी, खजिनदार सोमनाथ चौधरी, सचिव विष्णू सपरा, रंजना केणी, संजय केणी, योगिनी वैदू, ज्ञानेश अलदर, सुरेश म्हात्रे, उमेश म्हात्रे, देवेंद्र परांजपे, श्रीराम खुडील, अनिलकुमार दहे, सुनील पोकळे, सायली जाधव, अवधूत पवार, अजित उपरे विजयकुमार रोहोकले, अविनाश पाटील, उमेश म्हात्रे यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. सोहळा यशस्वी करण्यासाठी संघटनेच्या सर्व पदाधिकार्‍यांनी मेहनत घेतली.

Check Also

आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा …

Leave a Reply