Breaking News

काँग्रेसने सचिन पायलट यांना, तर पायलटांनी थेट काँग्रेसलाच हटविले

जयपूर : वृत्तसंस्था
काँग्रेसने सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हटविले आहे. पायलट यांच्यासोबतच त्यांच्या समर्थक दोन मंत्र्यांनाही मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. काँग्रेसच्या या कृतीला पायलट यांनीही प्रत्युत्तर देत सोशल मीडियाच्या आपल्या प्रोफाईलवरुन काँग्रेसचा उल्लेख हटवला आहे.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाची मंगळवारी पुन्हा जयपूरमध्ये बैठक झाली. या बैठकीलाही सचिन पायलट यांच्यासह त्यांचे समर्थक आमदार गैरहजर राहिले. त्यानंतर त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा ठराव बैठकीत मंजूर झाला.
आता काँग्रेस पायलट यांची पक्षातूनही हकालपट्टी करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तसे झाल्यास पायलट काय करणार याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
सत्य को परेशान किया जा सकता है, पराजित नही!
राजस्थानच्या उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या प्रदेशपदावरून हटवल्यानंतर सचिन पायलट यांनी एका ओळीचे ट्विट करीत प्रतिक्रिया दिली आहे. ’सत्य को परेशान किया जा सकता है, पराजित नही’, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, पायलट यांनी त्यांना 25 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला असून, आता पायलट नेमके काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply