Breaking News

जोरदार वार्‍यासह मुसळधार पावसाने ठिकठिकाणी वाताहत

उरण : वार्ताहर

उरण तालुक्यात मान्सून सक्रिय झाला असून जोरदार वार्‍यासह

मुसळधार पाऊस बुधवारी सुरु झाला. ठिक-ठिकाणी पाणी साचले. तर जेएनपीटी तीन क्रेन कोसळल्या, ठिक-ठिकाणी मोठी झाले मुळा सहित कोलमडले. वारा व पाऊस सकाळ पासूनच सुरुवात झाली. जोरदार वार्‍यामुळे दुपारी बाजार पेठ बंद होती.

शहरात काही ठिकाणी पावसाचे पाणी जमा झाले होते. दुचाकी वाहने बंद पडल्या होत्या. उरण-मोरा रोड वरील मोरा जवळील गणपती मंदिर समोर जुने मोठे वृक्ष मुळासकट उन्मळून गेले.

डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमचे मनोरे कोसळले

नवी मुंबई : बातमीदार

वादळी वार्‍याने डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवरील महाकाय मनोरे कोसळण्याची घटना बुधवारी घडली. यात कोणासही दुखावत झाली नसली तर मोठे नुकसान झाले आहे.

 दुपारी नवी मुंबईत वादळी पावसाला सुरुवात झाली. यात नवी मुंबईत अनेकठिकाणी वृक्ष कोसळून अतोनात हाल झाले आहेत. त्यात देशातील आंतरराष्ट्रीय स्टेडियम म्हणून ओळखले जाणारे नवी मुंबई नेरुळ येथील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमचमवर सजावट म्हणून उभारलेले आकर्षक मनोरे कोसले. यात कोणासही दुखापत झाली नसली तरी मोठे नुकसान झाले आहे. दुपारच्या सुमारास पावसाने व वार्‍याने वेग  पकडल्यावर ही घटना घडली. यात हे उंच लोखंडी मनोरे टॅग धरू न शकल्याने कोसळले. या आकर्षक मनोर्‍यांमुळेच डॉ. डी. वाय पाटील स्टॅटियमला जगभरात ओळख मिळाली होती. आयपीएल व फिफा वल्डकप अंडर 17 या जागतिक स्पर्धा या स्टेडियमवर झाल्या आहेत. तर जगातील महत्वाच्या गायकांचे कार्यक्रम या मैदानात झाले आहेत.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply