
पेण ः प्रतिनिधी
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. मंगेश नेने यांची रायगड जिल्हा शांतता समितीच्या सदस्यपदी नुकतीच निवड केली. अॅड. मंगेश नेने विविध सामाजिक कार्यात सहभागी असतात. ही निवड उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी संयुक्तपणे स्वाक्षरी केलेल्या अहवालानुसार रायगड जिल्हा शांतता समितीच्या अशासकीय सदस्यपदी दोन वर्षांसाठी करण्यात आल्याचे नियुक्तिपत्र जिल्हाधिकार्यांनी दिले. रायगडातील 15 सदस्यांची शांतता समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. प्रशांत नाईक (अलिबाग), मंगेश दांडेकर (मुरूड), अॅड. मंगेश नेने (पेण), सावळाराम जाधव (कर्जत), शैलेश चाफेकर (माथेरान, कर्जत), कृष्णा सारंग (मोहोपाडा, खालापूर), मोईन शेख (खोपोली, खालापूर), प्रदीप देशमुख (रोहा), रवींद्र लिमये (पाली, सुधागड), अस्लम राऊत (माणगाव), नाझीर कडू (तळा), इनायत खान देशमुख (रोहा), आदेश मुरुमकर (पोलादपूर), शाहिद उकये (म्हसळा), मंदार तोडणकर (श्रीवर्धन) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.