Breaking News

संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

संगीत, नाट्य आणि नृत्य क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानासाठी संगीत नाटक अकादमीतर्फे दिल्या जाणार्‍या फेलोशिप आणि विविध पुरस्कारांची घोषणा सोमवारी (दि. 15) करण्यात आली. प्रसिद्ध तबलावादक झाकिर हुसेन, नृत्यांगना सोनल मानसिंग, जतीन गोस्वामी आणि कल्याण सुंदरम पिल्लई यांना फेलोशिप तर प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, नाटककार राजीव नाईक, अभिनेत्री सुहास जोशी यांच्यासह 44 मान्यवरांना अकादमीचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. फेलोशिप जाहीर झालेल्या चारही मान्यवरांना प्रत्येकी तीन लाख रुपये आणि मानपत्र तर अकादमी पुरस्कार जाहीर झालेल्या कलावंतांना प्रत्येकी एक लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Check Also

‘सीकेटी‘त इतिहास विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय परिषद

विविध महाविद्यालये, विद्यापीठांतून 92 प्राध्यापक आणि संशोधकांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण …

Leave a Reply